तुळजापूर, दि. २५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या विचाराने केंद्र सरकारच्या सर्व योजना गरीब माणसाला सक्षम करणारे आहेत दीनदयाळ उपाध्याय यांनी यांनी या उद्देशाने राजकारण केले तो उद्देश नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून साध्य होताना दिसत आहे, असे विचार भारतीय जनता पार्टी महिला माजी जिल्हाध्यक्ष सौ. क्रांती थेटे यांनी काढले .
भाजप महिला मोर्चा जिल्हा उस्मानाबादच्या वतीने पंडीत दिनदयाळ उपाध्यक्ष यांच्या जंयती निमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले.त्यावेळी उपस्थित भाजप महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा,सौ. माधुरी गरड,माजी महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा अॅड.क्रांती थिटे यूवती मोर्चा जिल्हा अध्यक्ष पूजा देडे, तुळजापूर तालुका अध्यक्ष संतोष बोबडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजे निंबाळकर , सौ. पूजा राठोड, सौ. लक्ष्मी पांचाळ,सौ. कस्तूरा कारभारी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दिनेश बागल, सचिन रसाळआदी उपस्थित होते. त्यावेळी दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करून महिला आघाडीच्या वतीने विचार व्यक्त करताना माजी जिल्हाध्यक्ष सौ थिटे यांनी केंद्र सरकार गरीब माणसाला केंद्रस्थानी समजून आणि शेतकरी सक्षम होण्याच्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय घेत आहे केंद्रातील राजकारणामध्ये शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याचा अनुषंगाने केंद्र सरकारने महत्त्वाचे तीन विधेयक संमत केले आहेत याचा परिणाम लवकरच देशातील शेतकरी आणि देशवासियांना दिसणार आहे आज जे लोक विरोध करत आहेत महाराष्ट्र पंजाब आणि इतर राज्यांमध्ये शेती क्षेत्रात शेतकऱ्यांना समोर ठेवून केवळ राजकारण केले जात आहे हे सर्व चुकीचे असून केंद्र शासनाने अत्यंत दूरगामी विचार करून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी या विधेयकांना सादर केले आहे याचा प्रसार आणि प्रचार भाजप कार्यकर्ते प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरोघरी करणार आहेत असेही त्यांनी या निमित्ताने सांगितले. दीनदयाळ उपाध्याय यांनी ज्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी मध्ये कार्य पद्धती रुजवली आहे त्याला समोर ठेवून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी समाजातील सर्व क्षेत्राला न्याय देण्यासाठी जलद गतीने काम करीत आहेत याचे परिणाम कोरोना या आपतीच्या मधून बाहेर पडल्यानंतर देशवासियांना निश्चितपणे दिसतील अशी अपेक्षा आहे त्यांनी या निमित्ताने मांडली.
