इटकळ, दि. 25 : सुरतगाव ता. तुळजापुर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षकांनी स्वखर्चातून कोरोना प्रादुर्भावाच्या काळात विद्यार्थ्यांना घरीच अभ्यास करता यावा या उद्देशाने इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकेचे वाटप  केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुरतगांव केंद्राचे केंद्रप्रमुख रमाकांत  वाघचौरे  व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष  नवनाथ सुरते हे उपस्थित होते. प्रथम मान्यवरांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक  टी.एस.क्षीरसागर यांनी केला.हा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल सर्व शिक्षकांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष  नवनाथ सुरते यांनी केला. यावेळी श्रीमती समाने, श्रीमती हब्बु, कानडे आदी उपस्थित होते. 


 
Top