नळदुर्ग : सुहास येडगे

राज्य सरकारने धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण तात्काळ जाहीर करून धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटी आरक्षणाचा दाखला द्यावा अन्यथा यापुढील काळात सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तुळजापुर तालुका धनगर आरक्षण समितीचे सोमनाथ गुड्डे यांनी नळदुर्ग येथे धनगर समाजाच्या वतीने आयोजीत केलेल्या 'ढोल बजाओ, सरकार जगाओ' या आंदोलनात बोलताना म्हटले. 

दि. २५ सप्टेंबर रोजी धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाला तात्काळ एसटी प्रवर्गाचे आरक्षण तात्काळ द्यावे या मागणीसाठी संपुर्ण राज्यभर राज्यव्यापी ढोल बजाओ, सरकार जगाओ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. 

शुक्रवारी नळदुर्ग येथे तुळजापुर तालुका धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने 'ढोल बजाओ, सरकार जगाओ'हे आंदोलन करण्यात आले. तुळजापुर तालुका धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष पद्माकर घोडके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सोमनाथ गुड्डे, ज्ञानेश्वर घोडके, विलास येडगे, सुहास येडगे, सुनिल बनसोडे, राम जवान, प्रभाकर घोडके, मारुती घोडके, अमर भाळे,अमित शेंडगे यांच्यासह धनगर समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या आंदोलनाची सुरुवात अहिल्यादेवी होळकर चौकातुन करण्यात आली. याठिकाणी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी ढोल वाजवुन सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे तसेच प्रशासनाच्या सर्व सुचनांचे पालन करीत हे आंदोलन केले. अहिल्यादेवी होळकर चौक ते न.प.कार्यालय असा ढोल वाजवीत पदयात्रा काढण्यात आली. न.प.कार्यालयाच्या प्रांगणात या आंदोलनाची सांगता करण्यात आली. यावेळी तहसिलदारांचे प्रतिनिधी तलाठी टी.डी. कदम यांना धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने विविध धनगर समाजाला तात्काळ एसटी प्रवर्गाचे आरक्षण तात्काळ देऊन धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचा दाखला द्यावा, धनगर समाजाची एसटी प्रवर्गासाठी न्यायालयात चालु असलेल्या याचिकेला सरकारच्या वतीने चांगल्या वकिलांची नेमणुक करावी, याचिका जलद कोर्टात चालवावी, सरकारने जे आदिवासींना ते धनगर समाजाला या तत्वावर दिलेले १ हजार कोटी रुपयांचे पॅकेज त्वरीत द्यावेत, या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

 
Top