तुळजापूर, दि. २५ : हिंदी सिनेमातील लोकप्रिय गायक एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आकस्मित निधनाने चित्रपट आणि संगीत क्षेत्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे, बालसुब्रमण्यम हे मुलायम आणि श्रवणीय संगीत निर्मिती करणारे गायक होते अशा शब्दात संस्कार भारतीच्या वतीने प्रदेश सहमंत्री सतीश महामुनी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
एसटी बालसुब्रमण्यम यांच्या निधनानंतर तुळजापुरात संगीत क्षेत्रामध्ये अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली यामध्ये उद्योजक दत्तात्रय गवळी, शनिवार मंडळ अध्यक्ष लालासाहेब मगर, संस्कार भारती अध्यक्ष पद्माकर मोकाशे, युवा स्पंदन अध्यक्ष महेंद्र कावरे, जिजामाता प्रतिष्ठान अध्यक्ष महेश चोपदार, प्रा. रामलिंग थोरात, रोटरी क्लब अध्यक्ष नळेगावकर, सुधीर महामुनी, प्रफुलकमार शेटे, एस एन कुलकर्णी, महेश कुलकर्णी, संतोष डोईफोडे, प्रसाद महामुनी, लक्ष्मीकांत सुलाखे, संदीप रोकडे, कु. अनुराधा नाईक, सौ सविता भोसले, वनमाला मस्के, सौ गीता व्यास, नंदकुमार पोतदार, शशिकांत कवठाले, आंबरुषी शिंदे यांनी आपल्या शोकभवना व्यक्त केल्या.
