भुम, दि. 03 : 

लोकसेवक- 1) प्रदीप मधुकरराव जाधव, रा. महालिंगरायवाडी, ता. उमरगा 2) अनिल सदाशिव चव्हाण, रा. डोंजा, ता. परंडा (सध्या दोघे पंचायत समिती, परंडा येथे कार्यरत) 3) महादेव गणपती वारे, रा. चिंचोली यांनी दि. 11.01.2019 ते 24.06.2020 या कालावधीत संगणमताने बनावट दस्तऐवज बनवून, मुल्यवर्धीत दस्तऐवजाचा गैरवापर करुन मौजे चिंचोली, ता. भुम ग्रामपंचायत कार्यालयात एकुण 9,28,934/-रु. अपहार करुन शासनाची फसवणुक केली. तसेच घोटाळ्या संबंधीचे पुरावे नष्ट करण्यासाठी ते अभिलेख गायब केले. यावरुन ग्रामसेवक- दत्तात्रय गरड यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 409, 467, 468, 471, 201, 34 अन्वये गुन्हा दि. 02.09.2020 रोजी नोंदवला आहे.


 
Top