तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील मौजे सांगवी (मार्डी) येथे दि. 01.09.2020 रोजी गावातील डोलारे कुटूंबीयांतील कृष्णा, प्रशांत, शेषेराव, उषा डोलारे यांच्या गटाचा कांबळे कुटूंबीयांतील- आकाश, रामलिंग, शिवलिंग, हिमांशु, निलेश कांबळे यांच्या गटाशी मागील भांडणाच्या कारणावरुन वाद झाला. यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटांतील सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठी, विटा, लोखंडी गज, कुऱ्हाडीने मारहाण करुन जखमी केले.
अशा मजकुराच्या दोन्ही गटांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन दि. 02.09.2020 रोजी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
