बेंबळी : शालिवान सिद्राम माने, रा. कोटनिस नगर, सोलापुर हे शासकीय ठेकेदार आहेत. ते दि. 03.09.2020 रोजी 10.00 वा. सु. इनोव्हा कार क्र. एम.एच. 14 एचडब्ल्यु 9011 ने लासोना चौकातुन जात होते. यावेळी टाटा सफारी क्र. एम.एच. 25 आर 9104 या वाहनाने त्यांचा रस्ता आडवला. टाटा सफारीमधुन आलेल्या 1) महेश साळुंके 2) राजन देशमुख 3) रोहितराज दंडनाईक 4) राहुल पवार 5) ओम पवार, सर्व रा. उस्मानाबाद यांनी शालिवान माने यांना, “तु नितळी कारखान्याकडे कशाला गेला होता. या भागात फिरलास तर तुला संपवू.” असे धमकावून इनोव्हा कार मधुन बाहेर ओढून काढले आणि लाथाबुक्क्या, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच  इनोव्हा कारची पुढील- मागील काचा दगड- काठीने फोडून आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या शालिवान माने यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 341, 324, 427, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top