मुरूम, दि. 03 : येथील जिजाऊ बाल गणेश मंडळाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध कला प्रकार बुधवार (दि.२) रोजी सादर केले. यामध्ये नाटकाच्या माध्यमातून बाल गणेश मंडळाच्या बाल कलाकारांनी नाटीका सादर करताना कोरोना महामारीच्या समस्येच्या माध्यमातून श्रोत्यांमध्ये जनजागृती केली.
यावेळी गोरगरीब लोकांना मंडळाच्या वतीने अन्नदानाचे वाटप करण्यात आले. बेबाताई बेंडकाळे, रंजना शिंदे, शितल कलशेट्टी, राधिका बेंडकाळे, मीरा शिंदे, सविता बेंडकाळे, अरविंद बेंडकाळे, राजेंद्र व्ही. बेंडकाळे, राजेंद्र बेंडकाळे आदींनी या बाल कलाकारांना मार्गदर्शन केले. या मंडळाचे अध्यक्ष अदिती शिंदे, उपाध्यक्ष शुभम सोबाजी, सचिव अभिजीत बेंडकाळे, सदस्य दिपक कलशेट्टी, स्नेहा बेंडकाळे, मोहिनी शिंदे आदी बाल पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम पार पाडला.
