उस्मानाबाद, दि. 3 : जिल्हयात गुरुवार दि. 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवानुसार आज जिल्हयात 195 कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 141 रुग्ण बरे होवून घरी गेले आहत.
जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 411 वर पोहचली आहे. यापैकी 4 हजार 27 जण बरे झाले असून 2 हजार 2200 जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 184 जणांचा बळी गेला आहे.
