तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी, कोट्यावधी जणाचे आराध्यदैवत असलेल्या देशातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास अश्विन शुध्द १ शके १९४२ शनिवार दि. १७ आँक्टोबर रोजी विधीवत घटस्थापनेने प्रारंभ होत आहे.
तत्पुर्वी अधिक अश्विन वद्य ७ सह ८ शके १९४२ रोजी शुक्रवार दि .९ ऑक्टोबरपासून श्री. देवीची मंचकी निद्रा सुरू होणार आहे. श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन पुढीलप्रमाणे केले आहे.
शुक्रवार दि. ९ ऑक्टोबर रोजी तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेस सांयकाळी प्रारंभ होईल. शनिवार दि. १७ ऑक्टोबर रोजी देवीची पहाटे सिहांसनावर प्रतिष्ठापना आणि दुपारी 12 वाजता विधीवत घटस्थापनेनंतर शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. घटस्थापना झाल्यानंतर रविवार दि. १८ रोजी श्री देवीजींची नित्योपचारपुजा व रात्रौ छबिना आणि सोमवार दि .१९ रोजी श्रीदेवीजींची नित्योपचार पुजा व रात्रौ छबिना, मंगळवार दि . २० रोजी ललित पंचमी रथ अलंकार महापुजा व रात्रौ छबिना, बुधवार दि .२१ रोजी श्री देवीजींची नित्योपचार पुजा मुरली अलंकार, रात्रौ छबिना गुरुवार दि. 22 रोजी श्री देवीजींची नित्योपचार पुजा शेषशाही अलंकार,व रात्रौ छबिना शुक्रवार दि .23 श्री देवीजींची नित्योपचार पुजा , भवानी अलंकार, पुजा व रात्रौ छबिना शनिवार दि .24 श्री देवीजींची नित्योपचार पुजा , महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा पहाटे 2 वा. होमहवनास आरंभ व सकाळी ७ वाजुन ५ मिनीटाने पुर्णाहुती, तर रविवार दि. 25 महानवमी दिवशी तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा दुपारी १२ वाजता होमावर धार्मिक विधीनंतर घटोत्थापन, रात्री पलंग पालखीची मिरवणूक, विजयादशमी, सार्वत्रिक सिमोल्लंघन, सोमवार दि. 26 उषःकाली श्री देविजींचे शिबिकारोहन व मंचकी निद्रा, शुक्रवार दि. 30 रोजी कोजागिरी पोर्णिमा रात्री देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना, शनिवार दि .31 रोजी श्री तुळजाभवानी मंदीर पोर्णिमा रात्रौ सोलापूर काठ्यासह छबिना व जोगवा, रविवार दि .1 नोव्हेबर रोजी अन्नदान व रात्रौ सोलापूरच्या काठ्यासह छबिना. असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन नवरात्रौउत्सवा निमित्त केले आहे.
