नळदुर्ग : एस.के. गायकवाड

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते मिलिंद दादा रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आता पर्यंत तुळजापूर १७२ दिवसात तुळजापूर तालुक्यातील ३०१७ गरजू कुटुंबाना धान्य किटचे वाटप करण्यात आले असून या मानवतेची साखळी अखंड ठेवणाऱ्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जाते आहे.

वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, प्रबुद्ध कुष्ठरोग निर्मूलन व पुनर्वसन संस्था, कामठा,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थ उदगीर ,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व हितचिंतक दानशूर  यांच्या सहकार्याने व मिलिंद रोकडे ,जीवन कदम सुरेश चौधरी ,विकास बनसोडे ,आदींच्या पुढाकारातून  हे वितरणप करण्यात येत असून लाँडाऊन सुरु झाल्या पासून ते आज तागायत १७२ दिवसात तुळजापूर व परिसरातील एकूण ३०१७ गरजू कुटुंबाना किराणा व अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले आहे. दि.२९/सप्टेंबर रोजी तुळजापूर येथील वंचित बहुजन आघाडीचे लातूर व नांदेड जिल्हा निरिक्षक बालाजी शिंदे यांच्या हस्ते तुळजापूर येथे १७२ व्या दिवसी १३ कुटुंबाना किराणा किटचे वाटप करून एकून ३०१७ कुटुंबाचा अकडा गाठला आहे. प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद (दादा) रोकडे ,जीवन कदम,अनंत फुलसुंदर सर,बाळासाहेब जेटीथोर सर ,सुरेश चौधरी,बाळासाहेब राऊत कमलेश कदम,शुकेशन ढेपे, कृष्णा लोंढे  आदी उपस्थित होते.


 
Top