नळदुर्ग : एस.के. गायकवाड

जि.प. प्रथमिक शाळा वागदरी ता.तुळजापूर येथील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळा बंद शिक्षण चालू या उपक्रमा अंतर्गत स्वाध्याय पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू झाल्या नाहीत. मात्र मोबाईलच्या माध्यमातून आँनलाईन शिक्षण चालू आहे. पण ग्रामीण भागात अनेक मुलांच्या पालकाकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत. शिवाय मोबाईल रेंजची ही मोठी समस्या आहे.त्यामुळे अनेक मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे लक्षात घेऊन जि.प.प्रा.शाळा वागदरी येथील मुख्याध्यापिका महादेवी जत्ते सहशिक्षक तानाजी लोहार, वसंत जावळे, सहशिक्षिका चौधरी, सांगळे, साखरे आदी सर्व शिक्षकांच्यावतीने इयत्ता पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्याना  स्वखर्चाने  स्वाध्याय पुस्तिकाचे  वाटप केले आहे.  येथील सर्व शिक्षकांनी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे विद्यार्थी, पालक व ग्रामस्थातून समाधान व्यक्त केले जात आहे.

 
Top