उस्मानाबाद, दि. 27 : उस्मानाबाद जिल्हयात आज रविवार दि. 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 211 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 263 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 11 हजार 665 झाली आहे. यातील 9 हजार 35 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 351 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 279 जणांवर उपचार सुरु आहे.







