✏ तुळजापूर लाईव्ह | सकाळच्या टॉप हेडलाईन्स | दि. 1 ऑक्टोबर 2020
----------------------------------------------------
✍🏻 संकलन :- विकास नाईक 📱 8668973422
----------------------------------------------------
💫 उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) खासगी कंत्राटदाराच्या खशात घालण्याचा डाव; माजी जि.प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांचा आरोप...
💫 तुळजापूर : अधिक महिन्याच्या पार्श्वभूमीवर श्री तीर्थक्षेत्र तुळजापुरात भाविकांची गर्दी; मंदीर बंद असल्याने भाविकांना महाद्वारातूनच शिखर दर्शनावर समाधान मानावे लागत आहे...
💫 नळदुर्ग : येथील भुईकोट किल्ल्यातील प्रेक्षणीय असलेला नर-मादी धबधबा सुरु; मात्र कोरोमुळे पर्यटक नसल्याने किल्ला व धबधबा परिसरा सुनासुना...
💫 उस्मानाबाद : तालुक्यातील कसबे तडवळे येथील एस.पी. शुगर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला प्रति टन अडीच हजार रुपये दर देणार - चेअरमन सुरेश पाटील...
💫 नळदुर्ग : बुधवारी सायंकाळी वातावरणात बदल होऊन परिसरात तुरळक पाऊस झाल्याने सोयाबीन काढणीला व्यत्यय आला, पुन्हा शेतक-यासमोर निसर्गाची अडचण...
💫 परंडा : तालुक्यातील खंडेश्वरवाडी तलावा सांडवा फोडून पाण्याचा विसर्ग; पाणी सीना-कोळेगावच्या दिशेने, चिंचपूर व उंडेगाव येथील ग्रामस्थाना सुरक्षितस्थळी हलवले...
💫 वाशी : शासकीय कामात अडथळा आणणा-या भाजपा तालुकाध्यक्षावर गुन्हा दाखल...
💫 लोहारा : 30 सप्टेंबर 1993 च्या भुकंपातील मयतांना जेवळी व सास्तुर येथे सामुहिक श्रध्दांजली; सास्तुर गावातील संपूर्ण बाजारपेठ ठेवण्यात आली होती बंद...
💫 उस्मानाबाद : दि. 4 ऑक्टोबर रोजी उस्मानाबादेत ब्लड डोनर्स व्हॉटसॲप ग्रुपच्यावतीने महारक्तदान शिबीराचे आयोजन...
💫 बीड : नीटचा पेपर अवघड गेल्याने केतुरा ता. बीड येथील एका विद्यार्थ्याची गळफान घेऊन आत्महत्या....
-----------------------------------------------------------
🌀 आपणही आम्हाला बातम्या पाठवू शकता. व्हाटसअप नंबर 📱 8668973422
🌐 फेसबुक पेज लाईक करा - https://www.facebook.com/livetuljapur
-----------------------------------------------------------
