तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
राष्ट्रीय महामार्गावरील उळे ता दक्षिण सोलापूर या गावानजीक असलेला जुना दगडी पुल न पाडता त्यावरूनच राष्ट्रीय महामार्ग बनवला असुन तो पुल अरूंद असल्याने अपघात होऊन अनेकजण मृत्युमुखी पडले आहेत तो अरूंद पुल धोकादायक झाला असुन तो पुल मृत्युचा सापळाच बनला आहे याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
देशासह राज्यातील एकेरी रस्यावर होणार्या अपघाताची संख्या कमी होण्यासाठी तसेच दळणवळणाला चालना देण्यासाठी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितिन गडकरी यानी देशातील अनेक रस्ते चारपदरी करून वाहतुक सुरक्षित केली.अशाच पध्दतीचा सोलापूर ते धुळे हा राष्ट्रीय राजमार्ग करून हा रस्ता चारपदरी बनवला.या राष्ट्रीय राजमार्गावर सोलापूर ते तुळजापुर या रस्त्यावर गणपती घाट, हगलुर, उळे ,तामलवाडी,सुरतगाव,सांगवी मार्डी, व सिंदफळ या गावामध्ये उड्डाणपुल बनवण्यात आले.दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे या ठिकाणीही उड्डाणपुल बनवला असुन हा उड्डाणपुल बनवत असताना या गावानजिक शेकडो वर्षापुर्वी बांधण्यात आलेला व पुर्वीची दुहेरी वाहतुक असलेला जुना दगडी पुल राष्ट्रीय महामार्गाच्या संबधित अधिकारी यांनी न पाडता किंवा तो न रूंद करता तो अरूंद पुल तसाच ठेऊन त्यावरच डागडुजी केली व त्यावरूनच वाहतुक चालु केली.गावामध्ये असणार्या चारपदरी उड्डाणपुलावरून पुढे जात असताना पुढे असणारा अरूंद पुल वाहनचालकाच्या लक्षात येत नाही व अपघात घडुन अनेकजण मृत्युमुखी पडत आहेत.विशेष म्हणजे पुढे अरूंद पुल आहे असा फलकही तिथे दिसुन येत नसल्याने वाहनाचे अपघात होत आहेत.
राष्ट्रीय राजमार्ग बनवत असताना तो अतिशय जुना अरूंद दगडी पुल का पाडला नाही? तो धोकादायक अरूंद पुल पाडुन नविन पुल का बनवला नाही? जुना पुल तसाच ठेऊन पुल बनवला असे दाखवुन संबधितानी मलीदा तर लाटला नसेल ना? या पुलावर अपघात होऊन मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न तेथील नागरीकांनी उपस्थित केले आहेत.या अरूंद पुलावर सतत अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.आठवडाभरापुर्वीच याच अरूंद पुलावर आणखी एक अपघात घडला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यानी लक्ष घालुन हा अरूंद पुल का पाडला नाही याची चौकशी करावी तसेच हा जुना पुल पाडुन याठिकाणी नविन पुल बनवावा जेणेकरून विनाकारण प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागणार नाहीत अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थांमधुन जोर धरू लागली आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा ठराव समंत
उळे येथील या अरूंद पुलावर अपघात होऊन विनाकारण लोक मृत्युमुखी पडत असल्याचे महामार्ग प्राधिकरणचे संबधित अधिकारी याना सांगितले तरीही ते दुर्लक्ष करीत असल्याने यापुढे अपघात होऊन मृत्युमुखी पडल्यास याची जबाबदारी संबधित अधिकारी यांची असेल व त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने घेतल्याचा उळे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यानी बोलताना सांगितले आहे.
अपघातग्रस्त वाहन अजुनही पर्यायी रस्त्याच्या बाजूला पडुन
याच अरूंद पुलावर एका जीपचा अपघात होऊन या गाडीमधील अनेकजण मृत्युमुखी पडले होते ती अपघाग्रस्त गाडी आजही उळे गावातून तुळजापुरकडे बाहेर पडणार्या पर्यायी रस्त्याच्या बाजूला पडुन असल्याचे दिसुन येत आहे.
