बेंबळी, दि. २८ : बेंबळी पो.ठा. गु.र.क्र. 134 / 2017 या अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक- श्री. एस.एल. जमदाडे यांनी करुन आरोपी- कृष्णा दत्तू शिंदे, वय 24 वर्षे, रा. धारुर, ता. उस्मानाबाद याच्याविरुध्द आरोपपत्र सादर केले होते.
या पोक्सो विशेष खटला क्र. 35 / 2017 ची सुनावणी उस्मानाबाद जिल्हा व सत्र न्यायालय क्र. 1 मा. श्रीमती रेश्मीता राय यांच्या न्यायालयात सुरु होती. यात शासकीय अभियोक्ते- श्री. एस.एस. सुर्यवंशी यांनी बाजु मांडली. या खटल्याचा निकाल आज दि. 28.10.2020 रोजी जाहीर होउन नमूद आरोपीस मा. न्यायालयाने पोक्सो कायदा कलम- 4, 6 तसेच भा.दं.सं. कलम- 363, 366 (अ), 376 (1) च्या अपराधाबद्दल दोषी ठरवून खालीलप्रमाणे शिक्षा सुनावल्या आहेत.-
पोक्सो कायदा कलम- 6 च्या अपराधाबद्दल 10 वर्षे सश्रम कारावासासह 5,000 ₹ दंड तसेच दंड न भरल्यास 6 महिने अतिरीक्त साधा कारावास.
भा.दं.सं. कलम- 363 च्या अपराधाबद्दल 1 वर्षे सश्रम कारावासासह 1,000 ₹ दंड तसेच दंड न भरल्यास 1 महिना अतिरीक्त साधा कारावास.
अशा शिक्षा सुनावल्या असुन ठोठावण्यात आलेल्या एकुण 6,000 ₹ दंडा पैकी 5,000 ₹ रक्कम ही पिडीत अल्पवयीन मुलीस नुकसानभरपाई म्हणुन दिली जाणार आहे.