उस्मानाबाद, दि. 04 : उस्मानाबाद जिल्हयात आज रविवार दि. 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 189 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 57 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 12 हजार 760 झाली आहे. यातील 9 हजार 984 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 393 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 383 जणांवर उपचार सुरु आहे. 








 
Top