हन्नूर : नागराज गाढवे
डी.बी.एफ. दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय व दयानंद कला तर्फे महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती ऑनलाईन पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. एस. बी. क्षीरसागर हे होते. सर्वप्रथम महात्मा गांधी व लाल बहादुरशास्त्री यांची प्रतिमेचे पूजन प्रा.डॉ. व्ही.बी. किडगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रतिमा पूजनाचे छायाचित्रण लाइव्ह दाखविण्यात आला. त्यानंतर ऑनलाईन सामूहिक महात्मा गांधींच्या आवडत्या रघुपती राघव या भजनापासून पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली. यानंतर प्रा. डॉ. किडगावकर यानी महात्मा गांधी यानी व्यक्तिमत्व जीवनासाठी एकव्रत दिले आहेत. सत्य अहिंसा शरीरश्रम ब्रम्हचर्य सर्वधर्मसमभाव स्वदेशी आस्वाद यांचा यात समावेश आहे .आणि सर्वानी याचे पालन केल्यास समाजातील वाईट भावना दूर होतात, असे आपल्या मनोगतातुन म्हणाले.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतीक्षा शिंदे व सुमित गाडेकर यांनी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या कार्याची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षककेतर कर्मचारी विद्यार्थी आदी ऑनलाईन उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी गोरे यानी केले. तर आभार अभय पाटील यांनी मानले .
