तुळजापूर : कुमार नाईकवाडी
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीमध्ये तुळजापूर येथील भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षा मीनाताई सोमाजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. उमा गिरीश खापरे यांनी शनिवार दि. 3 रोजी मीनाताई सोमाजी यांना नियुक्ती पत्र दिले आहे. आपण आपल्या संघटन कौशल्याने राज्यभरात भा.ज.पा.महिला मोर्चाचे संघटन वाढविण्यासाठी अथक परिश्रम कराल, ही अपेक्षा आहे.असे सौ.उमा गिरीश खापरे यांनी पत्रात म्हटले आहे. मीनाताई सोमाजी यांची नियुक्ती झाल्याबद्दल तुळजापूर तालुका पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच अष्टभुजा महिला नागरी पतसंस्था यांच्या वतीने ही निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
