तुळजापूर : कुमार नाईकवाडी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) च्या तुळजापूर तालुका कार्याध्यक्षपदी जवळगा (मेसाई) येथील जेष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब मस्के यांची निवड करण्यात आली आहे.

दि. ३ ऑक्टोबर रोजी तुळजापूर येथे रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त रिपाइंच्या जिल्हा अधिवेशनाचे आयोजन जिल्हाअध्यक्ष राजाभाऊ ओव्हळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या अधिवेशनात रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर निष्ठा असणारे जवळगा(मेसाई ) ता. तुळजापूर येथील बाबासाहेब मस्के यांची सार्थ निवड करण्यात आली आहे. 

त्यांच्या या निवडीबद्दल रिपाइंचे मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आनंद पांडागळे, जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओव्हळ, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम,जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे,युवा आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे, तुळजापूर विधान सभा अध्यक्ष प्रकाश कदम,तुळजापूर शहराध्यक्ष अरुण कदम,नळदुर्ग शहराध दत्ता बनसोडे, सह कार्यकर्त्यांनी आभिनंदन केले आहे.

 
Top