तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजा भवानी मातेच्या दरबारात दि.९ आँक्टोबंर रोजी राज्य सरकार व केंद्रसरकाच्या विरोधात, सरकारला जागे करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने जागरण गोधंळाची जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वय समिती तुळजापुर यांच्या वतीने दि.४ रविवार रोजी येथील पुजारी मंडळ कार्यालयात पञकार परिषद घेण्यात आली.
या वेळी मराठा क्रांती मोर्चा च्या समन्वय समितीच्या पञकार परिषदेत बोलताना सकल मराठा क्रांती मोर्चा चे कार्यकर्ते म्हणाले की, राज्य व केद्रं सरकारने मराठा समाजास आरक्षण दिले होते. माञ या राज्य व केद्रं सरकारला न्यायालयात टिकविता आले नाही. म्हणून राज्य व केंद्र सरकारला जागे करण्यासाठी मोर्चाची संपुर्ण तयारी करण्यात आल्याची माहिती सांगितली . दि ९ आँक्टोबंर रोजी मराठा क्रांती मोर्चास जिल्ह्यातुन व तालुक्यातुन बाहेर गावाहुन ही मराठा बांधव मोर्चास मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव येणार आहेत. मराठा क्रांती मोर्चास जिल्ह्यातुन तालुक्यातुन उस्फुर्तपणे पाठींबा मिळत आहे. सध्या संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चास येणाऱ्या मराठा बांधवाना गावाबाहेरील रस्ते नळदुर्ग रोड, उस्मानाबाद रोड,लातुर रोड व सोलापूर रोड या रस्त्यावर बँरिकेटस लावुन गर्दीवर नियंत्रण राहता यावे या करिता टप्पा-टप्याने तुळजापुर शहरात दाखल होणार आहेत. शहरात आल्यावर न.प.च्या वतीने सँनिटायझर ,फवारणी करण्यात येणार आहे. तसेच ५ हजार मास्क ही वाटप करण्यात येणार आहेत.
श्री तुळजा भवानी मातेच्या मंदीर परिसरात जागरण गोधंळाचे आयोजन करण्यात आले आहे. भवानी रोड वरील भागात खुर्च्या किंवा मँट अंथरुन मराठा समाज बांधवाची सामाजिक अंतर पाळुन व्यवस्था करण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चा शांततेने काढण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात छञपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करुन होणार आहे.
या मराठा क्रांती मोर्चा चे नियोजन कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांकडुन अपेक्षा न ठेवता स्वःताहुन सकल मराठा क्रांती मोर्चा चे समन्वय समितीचे कार्यकर्ते स्वःता हुन स्व खर्चाने करीत असल्याचे सांगितले. या मध्ये सँनिटायझर, मास्क पिण्याचे पाण्याचे जार, झेंडे, बँनर मराठा टोप्या, स्टेज व्यवस्था आदीसह इतर वस्तु या स्वखर्चाने करण्यात येणार आहेत.
या राज्य व केंद्र सरकारने मराठा समाजावर अन्याय केला आहे. यापुढे आम्हांला आरक्षण मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही. आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे करु द्या, आता आम्ही मागे हटणार नाही तरी राज्य व केंद्र सरकारने लवकरात लवकर आरक्षणावरील स्थगिती उठवावी व मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे, आरक्षण उठविले तर आम्ही मराठा क्रांती मोर्चा आनंदोत्सव साजरा करेल, असे यावेळी सांगण्यात आले.
या मराठा क्रांती मोर्चाच्या पञकार परिषदेत नगराध्यक्ष सचिन रोचकरी, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव सांळुके, पुजारी मंडळाचे संचालक तथा रा.काँ युवकचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, युवा सेनेचे प्रतिक रोचकरी, सकल मराठा क्रांती मोर्चा चे महेश गवळी, धैर्यशील कापसे, अर्जुन सांळुके, कुमार टोले, आण्णासाहेब क्षिरसागर, जनहित संघटनेचे अध्यक्ष अजय सांळुके, अशोक फडतरे, राम चोपदार, मारुती जाधव, हणमंत पुजारी, आदीसह सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

