ठाणे, दि. 04 : अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश (कोकण विभाग) अध्यक्षपदी ठाणे जिल्ह्यातील विशाल कुरकुटे यांची नियुक्ती करण्यात आली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदुरकर यांच्या आदेशाने व राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश इंदुरकर व राष्ट्रीय सचिव संतोष कुरूडे, महिला सचिव विद्याताई गडाख यांच्या एकमताने विशाल कुरकुटे यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कोकण विभाग निवड करण्यात आली आहे. विशाल कुरकुटे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
