काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जि.प. प्रशालेतील विद्यार्थी घेत आहेत ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे सध्या शाळा बंद आहेत परंतु विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू आहे. आपल्या देशाचे उद्याचे भवितव्य आज कोरोनामुळे अडचणीत आहे. ही विद्यार्थाची अडचण लक्षात घेता विद्यार्थांना प्रशालेतून ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण दिले जात आहे.
प्रशालेतील विद्यार्थांचा लेखी स्वरूपातील प्रथम सत्रापर्यंतचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी शिक्षकांकडून विद्यार्थांना मोफत स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात आले . सदरील स्वाध्याय पुस्तिका शिक्षकांनी स्वखर्चातून विद्यार्थांना पुरविण्यात आल्या आहेत . त्यामुळे सर्व शिक्षकांचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ . शालूताई म्हेत्रे व सदस्य यांनी अभिनंदन केले .
स्वाध्याय पुस्तिकाचे वाटप पालकांच्या शुभहस्ते करण्यात आले . देशाचे हे भावी नागरिक आज घरी बसून शिक्षण घेत आहेत . तसेच बरेच विद्यार्थी जीवन विषयक गोष्टी स्वयं-अध्ययनातून व अनुभवातून शिकत आहेत.
विद्यार्थांच्या शिक्षणासाठी प्रशालेतील शिक्षकांकडून व्हॉटस् अॅप, यू ट्यूब, ऑनलाईनच्या माध्यमातून अध्ययन अध्यापन प्रक्रिया कार्यान्वीत केली जात आहे . शाळेचे मुख्याध्यापक श्री .सय्यद ए ए तसेच शिक्षक श्री राठोड एस. आर, भुमकर जी एस , कदम एच. डी,भालेराव एस. एम, श्रीम.सुरवसे एस. ए, श्रीम.क्षीरसागर व्ही एस हे सर्व शिक्षक विद्यार्थ्याना मार्गदर्शन करीत आहेत. प्रशालेतील या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.
