✏    तुळजापूर लाईव्ह | सकाळच्या टॉप हेडलाईन्स |  दि. 3 ऑक्टोबर 2020



🎯  *ताज्या अपडेटसाठी लॉग ईन करा -* www.tuljapurlive.in

---------------------------------------------------- 

✍🏻  *संकलन :- विकास नाईक 📱 8668973422*

---------------------------------------------------- 

उस्मानाबाद : मराठा आरक्षणासाठी शहरातील खासदार व आमदार यांच्या कार्यालयासमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले...

परंडा : तालुक्यातील खंडेश्वरवाडी येथील तलावाची जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केली पाहणी; तलाव दुरुस्तीचे काम वेगाने करण्याच्या केल्या सूचना...

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान मार्फत सर्वसामान्य रुग्णांसाठी सुसज्ज रुग्णालय सुरु करण्याची मागणी...

उस्मानाबाद : शेतकरी-कामगार विरोधी विधेयकाच्या निषेधार्थ काँग्रेसचे उस्मानाबादेत धरणे आंदोलन...

लोहारा : तालुक्यातील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज या कारखान्याचा 6 वा बॉयलर अग्निप्रदीपण सोहळा संपन्न...

मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका पुष्पा भावे यांचं निधन, मुंबईत अखेरचा श्वास घेतला; पुष्पा भावे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये घेतला होता सहभाग...

अक्कलकोट : माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे वडील तथा दुधनी कृषी बाजार समितीचे विद्यमान सभापती सातलिंगप्पा संगप्पा म्हेत्रे यांचे वयाच्या 90व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन...

सोलापूर : नुकसान भरपाईसाठी तलाठ्याला दगडाने मारले, एकावर गुन्हा; मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथील घटना...

बार्शी : वैराग पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबलास तीन हजार रुपयाची लाच घेताना अटक; दाखल  गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी मागितली होती लाच...

हिंगोली : रुग्णवाहिका न आल्याने पीपीई कीट घालुन नातेवाईकानी केले अंत्यसंस्कार; कोरोना योध्दा गुरुजींच्या मृत्यूनंतर हालअपेष्टा...

-----------------------------------------------------------

🌀 आपणही आम्हाला बातम्या पाठवू शकता. व्हाटसअप नंबर 📱 8668973422


🌐 फेसबुक पेज लाईक करा - https://www.facebook.com/livetuljapur

-----------------------------------------------------------

 
Top