काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शुक्रवार दि. 2 रोजी  राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी त्र्यंबकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बसवणप्पा मसुते, प्राचार्य जाधव एस.के. पर्यवेक्षक हळकरे जी.टी. यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी संस्थेचे सचिव यशवंत लोंढे, प्रशालेचे प्राचार्य  एस.के.जाधव, पर्यवेक्षक  हलकरे जी.टी.,माडजे ए.डी., साळुंखे सी.एच.,जाधव पी.पी.,वडणे एस.डी.,सावळे सी.के.,सीताफळे एस.डी., पाटील एल.एस.,मसुते एम. एम.,साठे बि.डी.,माळी एम. जी.,महिला शिक्षिका श्रीमती पिरजादे एस.जे.,पाटील व्ही. पी.,गीरे एम.जे.,सावंत एम.एन. आदीसह प्रशालेतील  शिक्षक, शिक्षकेत्तर  कर्मचारी,ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top