नळदुर्ग : एस.के.गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथे अंगणवाडीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची व भारत देशाचे दुसरे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली आहे.तसेच गांधी जयंती दिनी अंगणवाडी स्थापन वर्धापन दिन ही साजरा करण्यात आला.
प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पुजन सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, उपसरपंच दत्ता सुरवसे, अंगणवाडी कार्यकर्ती पद्मीनबाई पवार ग्रा.प.सदस्य रावसाहेब वाघमारे, पत्रकार एस.के गायकवाड यांच्या हस्ते पूजन करून आभिवादनव करण्यात आले.
तसेच दि २ ऑक्टोबर १९७५ रोजी महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे अवचित साधून एकात्मिक बालविकास प्रकल्पाअंतर्गत शासनाने बालकांच्या सर्वांगीन विकासासाठी शिक्षाची आवड निर्माण व्हावी, त्याचे आरोग्य चांगले रहावे, कुपोषित बालकांचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने शहरी व ग्रामीण भागात गावोगावी वाडी वस्तीत अंगणवाडीची स्थापना करण्यात आली. त्यामुळे महात्मा गांधींजींच्या जयंती दिनी अंगणवाडी स्थापना वर्धापन दिनही साजरा करण्यात आला.या निमित्ताने घेण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या रांगोळी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी सहशिक्षक तानाजी लोहार,अंगणवाडी मदतनीस रूपाली जाधव सह शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
