नळदुर्ग, दि. 03 : तुळजापूर तालुक्यातील रामतिर्थ, रामनगर, येडोळा, गायरान तांडा, जकणी तांडा येथे एसबीआय फाउंडेशन मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या समन्वयातून ग्रामसेवा कार्यक्रम ऑक्टोबर 2017 ते सप्टेंबर 2020 या तीन वर्षात राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत या पाच गावात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, विद्युतीकरण, शुद्ध पाणीपुरवठा, उपजिविका विकास, स्वच्छतेची विविध विकासात्मक कामे करण्यात आली. या कामाच्या हस्तांतरण कार्यक्रम 2 ऑक्टोबर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायतीला करण्यात आले.
यावेळी रामतिर्थ येथे एसबीआय बँकेचे सिनियर व्यवस्थापक उस्मानाबाद मिलिंद जरीपटके यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे भारतीय स्टेट बँक स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था उस्मानाबादचे कार्यक्रम अधिकारी विकास गोपने, दिलासाचे विलास राठोड, अंतर्यामी कर्जे, किरण काळे,रामतिर्थचे ग्रामसेवक अनिल पाटील, रामतिर्थचे सरपंच बालाजी राठोड, येडोळाचे सरपंच पद्माकर पाटील, कृषी विज्ञान मंडळ जळकोटचे अध्यक्ष मेघराज किल्ले, ग्रामपंचायत सदस्य रामू चव्हाण, येडोळा ग्रामपंचायत सदस्य शिवाजी राठोड, देविदास नाईक, मा.ग्रा.पं. सदस्य ताराचंद पवार, देविदास पवार, सिताराम चव्हाण शेषराव राठोड, सुरेश राठोड, शिवाजी पवार, गुरुदेव राठोड, अजित राठोड बाळासाहेब चव्हाण, लक्ष्मण राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमात एसबीआय फाऊंडेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर के. मंजुळा मॅडम प्रेसिडेंट निक्सन जोसेफ, CGM महाराष्ट्र दिलासाच्या उपाध्यक्षा वैशाली खाडिलकर यांनी ऑनलाईन संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रामतिर्थचे सरपंच बालाजी राठोड यांनी मानले.
