तुळजापूर, दि. 10 : तुळजापूर शहरात शुक्रवार दि. 9 रोजी मराठा आरक्षण मोर्चा संदर्भात श्री तुळजाभवानी मंदीर महाद्वारासमोर जाहीर सभा आयोजीत करण्यात आली होती. या सभेत गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी अनेकांच्या गळ्यातील 65 ग्रॅम सोन्याचे दागिने व खिशातील रोख रक्कम असा माल चोरी केला होता. यावरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अन्वये पो.ठा. तुळजापूर येथे गु.र.क्र. 340 / 2020 हा दाखल आहे. सदर चोरीप्रकरणी 5 आरोपींना पोलीसान ताब्यात घेतले आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हा शाखेच्या व तुळजापूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने आरोपी- 1)आकाश भगवान काळे, वय 32 वर्षे 2)गजानन आकाश करंजकर, वय 28 वर्षे, दोघे रा. सुळ गल्ली, लातूर 3)दत्ता वसंत गिरी, रा. बाभळगाव, जि. लातुर 4)मयुर संजय मस्के, रा. लातुर 5)सिध्दार्थ संजय जाधव, रा. शिरापुर, ता. शिरुर यांना ताब्यात घेउन नमूद चोरीच्या मालापैकी 13,500/-रु. रोख रक्कम व चोरीच्या दोन मोबाईल फोनसह गुन्हा करण्यास वापरलेली हिरो एचएफ डीलक्स मो.सा. क्र. एम.एच. 24 बीएच 4307 ही जप्त केली आहे.
