जळकोट : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट बीटमधील वेगवेगळे उपक्रम राबविणारी आय. एस .ओ. मानांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मानमोडी येथे विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या स्वखर्चातून स्वाध्याय पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
कोरोना सारख्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाते. आता या विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका दिल्यामुळे अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना सोपे जाईल.विद्यार्थी अधिक जोमाने अभ्यास करतील. असे मत विस्तार अधिकारी जी. एन .सर्जे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपले मत व्यक्त केले.
यावेळी केंद्रप्रमुख अरुण अंगुले, संभाजीनगर शाळेचे मुख्याध्यापक धनराज रेणुके, जळकोटवाडीचे सहशिक्षक अशोक राठोड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिपान गुंजकर ,उपाध्यक्ष शुभांगी सुरवसे ,सदस्य राजेंद्र गायकवाड, सदस्य जितेंद्र चौगुले, मुख्याध्यापक विक्रम पाचंगे, रमेश दूधभाते, राम कृष्ण मोहिते, श्रीमती सुचिता चव्हाण आणि विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमामुळे मानमोडी गावातील ग्रामस्थ व सरपंच गोपाळ सुरवसे यांनी शाळेचे खूप कौतुक केले आहे.
