उस्मानाबाद, दि. 10 : उस्मानाबाद जिल्हयात आज शनिवार दि. 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 74 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 169 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 13 हजार 218 झाली आहे. यातील 10 हजार 995 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 424 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 799 जणांवर उपचार सुरु आहेत.




