उस्मानाबाद, दि. 12 : उस्मानाबाद जिल्हयात आज सोमवार दि. 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 50 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 130 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 13 हजार 426 झाली आहे. यातील 11 हजार 364 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 432 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 630 जणांवर उपचार सुरु आहेत.



