तुळजापुर : कुमार नाईकवाडी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर उघडण्यासाठी  भारतीय जनता पार्टीच्या वतीने दि.१३ मंगळवार रोजी श्री तुळजा भवानी मातेच्या मंदीरा समोर लाक्षणिक उपोषण करुन आंदोलन करण्यात आले. यावेळी आघाडी सरकारच्या विरोधात घोषणबाजी करण्यात आले.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेचे मंदीर गेल्या १७ मार्च पासुन बंद आहे  ७ महिने झाले मंदीर बंद असल्यामुळे तुळजापुर शहरातील व्यापारी व पुजारी वर्गाचे मोठे हाल होत आहेत. शहराचे अर्थकारण संपुर्ण कोंडमले असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.  ना मंदीर संस्थान ने  ना राज्य शासना ने कोणतीही मदत केली नाही. " जय भवानी " जय शिवाजी" हे घोष वाक्य महाराष्ट्राचे आहे . मग शारदीय नवराञ महोत्सवात श्री तुळजा भवानी मातेचे दार बंद का? इतर राज्यातील मंदीरे उघडले मग महाराष्ट्रातच का बंद? राज्यात मद्य विक्री बार रेस्टारँट चालु ,माँल चालु  मग मंदीरे बंद का ?  "मंदीर बंद उघडले बार" उद्ववा धुंद तुझे सरकार माँल,  बार मध्ये कोरोना होत नाही का? मग मंदीरे बंद का? असा सवाल उपस्थित करुन  तिघाडी सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करुन भारतीय जनता पार्टीच्या वतीने दि.१३ मंगळवार रोजी श्री तुळजा भवानी मातेच्या मंदीरा समोर लाक्षणिक उपोषण करुन आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात महाराष्ट्र भाजपाच्या  माहिला आघाडीच्या मोर्चा अध्यक्षा उमाताई खापरे, जि.प. सदस्या अर्चना राणाजगजितसिंह पाटील, शैलजा मुळीक, स्वाती जाधव अँड. अंजली साबळे, क्रांती थिटे, माहिला आघाडीच्या महाराष्ट्र सरचिटनीस मिना ताई सोमाजी, माजी नगराध्यक्षा अर्चनाताई गंगणे, नगरसेविका भारती गवळी, माजी नगराध्यक्षा संगिता कदम, महानंदा पैहलवान आदीसह माहिला उपस्थित होत्या. तसेच भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष अँड. नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, सतिश दंडनाईक, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवा नेते विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष बापु कने, अभिजित कदम, नानासाहेब लोंढे, नारायण नन्नवरेझ नागेश नाईक, आनंद कंदले,  विशाल रोचकरी, सचिन रसाळ, विशाल छञे, शिवाजी बोधले, सागर कदम, गुलचंद व्यवहारे, विकास मलबा सुहास सांळुके, विजय माने प्रसाद पानपुडे, बाळासाहेब श्यामराज, उमेश गवते, बाळासाहेब भोसले, शांताराम पेंदे, इंद्रजीत सांळुके, शहाजी भांजी, गिरीष देवळाकर, शिवाजी डावखरे आदीसह भा.ज.पा.चे कार्यकर्ते लाक्षणिक उपोषणात उपस्थित होते.

 
Top