अचलेर : जय गायकवाड
लोहारा तालुक्यातील जेवळी (उत्तर)येथील शहीद सुभेदार आप्पाराव मारुती कांबळे यांच्या पार्थिवावर दि.१३ मंगळवार रोजी दुपारी २:३० वाजता हिप्परगा रोड वरील त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
भारतीय सैन्यदलात सुभेदार पदावर कार्यरत असलेले शहीद आप्पाराव मारुती कांबळे वय ४५ वर्षे यांचे पुणे येथील कमांड हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान रविवार दिनांक ११ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
आप्पाराव कांबळे हे १३ महार रेजिमेंट मध्ये सुभेदार पदावर कार्यरत होते. गेल्या महिनाभरापासून ते आजारी होते.
सोमवारी सायंकाळी भारतीय सैन्याच्या वतीने पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये मानवंदना देऊन त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी जेवळी कडे पाठवून देण्यात आले.आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी येताच सर्वांनी दुःखी अंतःकरणाने आक्रोश केला.
भारत माता की जय,वंदे मातरम्,वीर जवान तुझे सलाम अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
एक सच्चा देशसेवक हरवल्याने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. उपस्थित सर्वांच्या नयनी अश्रुंच्या धारा वाहत होत्या.
त्यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुले,एक भाऊ असा परिवार आहे.जवान लक्ष्मण कांबळे यांचे ते मोठे बंधू होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे,

