उस्मानाबाद, दि. 15 : उस्मानाबद जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासुन परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून पिकांसह फळबागांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचे, क्षेत्राचे पंचनामे करून प्रपत्रात मंगळवार दि. २० ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश बुधवार दि. 14 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी जिल्हा कृषी अधिकारी, उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब, भुम, लोहारा, वाशी, परंडा, उमरगा तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना पत्र देवून उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे आदेशित केले आहे.
