लोहगाव : निजाम शेख

लोहगाव ता. तुळजापुर शिवारात गेल्या तीन दिवसापासुन परतीच्या पावसाने झोडपुन काढले आहे. त्यामुळे येथील खंडाळा धरण (प्रकल्प) शंभर टक्के भरला असून सांडवा दुथडी भरुन वाहत आहे. 

खंडाळा प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने लोहगावसह जळकोट, हंगरगा (नळ), नंदगाव, बोरगाव, आलियाबाद, इंदिरानगर, रामतिर्थ, येडोळा आदी गावाचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून आठ ते दहा गावांना दिलासा मिळाला आहे. यामुळे शेतकर्यांसह नागरीकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.


या भागात  दमदार पाऊस झाल्याने लोहगाव-खंडाळा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. तसेच कोरोनाच्या पार्शभुमीवर सर्वच पर्यटन स्थळे प्रवेश बंदी असल्याने येथील खुल्या निसर्गरम्य परिसरात असलेल्या हा खंडाळा प्रकल्प पाहण्यासाठी  पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. प्रकल्पाचे उंच सांडव्यातून पडणारे पाणी, परीसरातील गर्द हिरवीगार झाडी  व येथून जवळच असलेला रामतिर्थ धबधबा, तसेच नळदुर्ग बॅरेजेस (डॅम) हे सर्व निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी गर्दी होत आहे. त्यातच यंदा कोरोनामुळे राज्यात प्रसिद्ध आसलेल्या नळदुर्ग  ऐतिहासिक किल्ल्यात प्रवेश बंद असल्याने पर्याटकांची खुल्या निसर्गरम्य  परिसरासला पसंदी दिसत असून लोहगाव-खंडाळा व रामतिर्थ  परिसरात पाहण्यासाठी  पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

 
Top