उस्मानाबाद, दि. 15 : परतीच्या पावसाने गेल्या तीन दिवसांपासून उस्मानाबाद जिल्हयात धुमाकूळ घातला आहे. यामुळे पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे काढून ठेवलेले सोयाबीन भिजले आहे. ज्या  शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे. त्यांनी पीक भिजल्यानंतर ७२ तासांत पीक विमा कंपनी व कृषी विभागाकडे तक्रार दिल्यास नुकसान भरपाई मिळण्यास मदत होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे सोयाबीन भिजल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. यात ज्या शेतक-यांनी पीकवीमा काढला आहे त्यांनी ७२ तासाच्या आत शेताचा सर्वे क्रमांक व नुकसानग्रस्त क्षेत्र हा तपशील कळवणे बंधनकारक आहे. प्राप्त झालेल्या सुचनेनंतर संयुक्त समिती शेतकऱ्याच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करण्यात येईल. तसेच नुकसानीचा अहवाल १० दिवसात सादर करण्यात येईल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांनी गूगल प्ले स्टोअर वरून crop insurance किंवा विमा कंपनीचे Farmmitra हे ॲप डाऊनलोड करावे. त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती द्यावी. काही अडचणी आल्यास १८००२०९५९५९ या टोल फ्री क्रमांकावर किंवा कृषि विभागाच्या कार्यालयात अर्ज करून कळवावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

 
Top