लोहारा, दि. 27 : कोविड- 19 संसर्गाच्या अनुशंगाने मा. जिल्हाधिकारी तथ अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी विविध मनाई ओदश जारी केले आहेत. असे असतांनाही ते मनाई आदेश झुगारुन 1)उमाकांत लांडगे 2)दगडु तिघाडे, दोघे रा. लोहारा 3)गणेश सोनटक्के, रा. जळकोट 4)प्रकाश घाडके, रा. माकणी 5)तानाजी गायकवाड, लोहारा (खु.) 6)रंजना हासुरे, रा. हाराळी 7)आशिष पाटील, रा. वाशी 8)विष्णु वाघमारे, रा. सास्तुर 9)तिम्मा माटे, रा. कास्ती अशा सर्वांनी 100 ते 150 लोकांना एकत्र जमवून दि. 26.10.2020 रोजी 13.45 वा. सु. शिवाजी चौक, लोहारा ते तहसील कार्यालय, लोहारा यामार्गे नियमबाह्य मोर्चा काढला. यावरुन लोहारा पो.ठा. चे पोना- पोपट क्षिरसागर यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद 9 व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269, सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


 
Top