उस्मानाबाद, दि. 27 : नरेंद्र बंडोपंत झरकर, रा. उस्मानाबाद यांना दि. 15.10.2020 रोजी 12.57 वा. सु. दोन अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन कॉल आले की, “तुमचे क्रेडीट कार्ड चालू करायचे आहे.” असे सांगुण अविनाश वाघमारे यांना त्या फोनवरील व्यक्तीने बोलते ठेवले. यावर अविनाश वाघमारे यांना आलेले ओटीपीचे संदेश त्यांनी वाचून खात्री न करता फोनवर बोलणाऱ्या समोरील व्यक्तीस सांगीतल्याने त्या अनोळखी मोबाईल क्रमांकाच्या व्यक्तीने नरेंद्र झरकर यांच्या बँक खात्यातील 55,898/-रु. रक्कम ऑनलाईन पध्दतीने स्थलांतरीत करुन नरेंद्र झरकार यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या नरेंद्र झरकर यांनी काल दि. 26.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी), (डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top