उस्मानाबाद, दि. 19 : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दि. 19 व दि. 20 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्हयाच्या दौ-यावर येणार आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :-
- संध्याकाळी 5 वाजता परांडा येथे आगमन. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करतील. रात्री 9 वाजता उस्मानाबाद येथे आगमन व मुक्काम. त्यानंतर मंगळवार दि. 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता उस्मानाबाद तालुक्यातील बेगडा येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करतील. यानंतर सकाळी 9.30 वाजता आपसिंगा ता. तुळजापूर येथे नुकसान झालेल्या गावांची व शेतीची पाहणी करुन सकाळी 10 वाजता आपसिंगा येथील शंकर चांगदेव जमदाडे यांच्या शेतात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.