किलज : राम जळकोटे

तुळजापूर तालुक्यातील किलज येथे मुसळधार पावसामुळे गावातील शेतीसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये नदीलगत असलेल्या कुटुंबाची घरे ही पाण्यात वाहून गेली होती. या कुटुंबाच्या मदतीसाठी अनेक लोकप्रतिनिधी, संस्था, संघटना धावून येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर गावातील नागनाथ शिंदे यांनी आपल्या माध्यमातून या कुटुंबाना ब्लॅंकेट आणि इतर वस्त्र वाटप केले आहे. 

यावेळी अमोल शिंदे, नागनाथ शिंदे व आपत्तीग्रस्त कुटुंबिय उपस्थित होते. शिंदे यांनी आपल्या माध्यमातून या कुटुंबाना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.

 
Top