अचलेर : जय गायकवाड
गेल्या ११ वर्षांपासून उमरगा तालुक्यातील मुरूम येथील सरकार भिमराज ग्रुप यांच्या वतीने मुरूम ते सिद्धार्थ बुध्दविहार गुलबर्गा याठिकाणी पायी धम्मप्रचार व प्रसार रथ यात्रा अभियान या धम्म जागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. पण या वर्षी कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता.,यावर्षी एका नवीन उपक्रमाचे आयोजन या ग्रुप च्या वतीने करण्यात आले आहे.
तो उपक्रम असा की शेजारील गावामधे ज्याठिकाणी विहार आहे त्याठिकाणी जावून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व तथागत भगवान गौतम बुद्ध,विश्वरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर,राजा सम्राट अशोक यांची प्रतिमा भेट देण्याचे ठरवले. त्यानुसार आज आलूर व अचलेर येथील विहारास भेट देऊन सरकार भिमराज ग्रुप चे अध्यक्ष आयु.आनंदकुमार कांबळे व त्यांचे सर्व सहकारी धम्मबांधव यांच्या वतीने शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य व विहारास प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी सर्व बौद्ध उपासक-उपासिका,शालेय विद्यार्थी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.