चिवरी, दि. 21 : तुळजापूर तालुक्यातील चिवरी शिवारात गवळी धनाजी यांच्या शेतात एका युवकाचा दगडाने ठेचून खुन करुन मृतदेह आरळी-चिवरी रस्त्यालगत टाकुन दिल्याचे बुधवार दि.21 ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान आढळून आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सख्या भावानेच भावाचा खुन केल्याची चर्चा घटनास्थळी सुरु आहे.

लक्ष्मण मारूती येडगे (अंदाजे वय 35, रा. येवती ता.तुळजापूर) असे मयताचे नाव असल्याचे पोलीस पाटील दिनकर पाटील यांनी बोलताना सांगितले. दरम्यान, ही घटना समजताच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे, कैलास लहाने, सहाय्यक पोलीस फौजदार राजाभाऊ सातपुते, पोलीस नाईक संतोष सोनवणे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

 
Top