तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
स्टेट इनोव्हेशन ॲन्ड रिसर्च फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा सर फाउंडेशन टिचर इनोव्हेशनन नॅशनल अवार्ड २०२० देशभरातील १६९ प्रयोगशील शिक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांना जाहीर झाला असून यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील आठ शिक्षक व क्षेत्रीय अधिकारी यानाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती राज्य समन्वयक हेमा शिंदे,बाळासाहेब वाघ व सिध्दराम माशाळे यांनी तुळजापूर लाईव्हशी बोलताना दिली आहे.
राष्ट्रीय स्तर नवोपक्रम स्पर्धा २०२० मधुन या शिक्षकांची निवड करण्यात आली असून ईज्युकेशन इनोव्हेशन बॅंक प्रकल्पांतर्गत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर तज्ञ समितीकडून ही निवड केली जाते तसेच या पुरस्काराचे वितरण डिसेंबर २०२० मध्ये आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात होणार असल्याची माहिती राज्य समन्वयक हेमा शिंदे,बाळासाहेब वाघ व सिध्दराम माशाळे यांनी तुळजापूर लाईव्हशी बोलताना दिली आहे.
या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील श्रीमती रंजना स्वामी(प्रा.शा.काटगाव), गोपाळ भोसले (प्रा.शा.गंजेवाडी), गुणवंत चव्हाण (प्रा.शा.पिंपळा खुर्द), माध्यमिक गटातून हिराकस पवार,अधिकारी मल्हारी माने, रंजना मैंदर्गीकर, संजय पवार, बुधाराम आदींचा समावेश असुन यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होताना दिसत आहे.
