उस्मानाबाद, दि. 09 : हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना जिल्हयासाठी द्राक्ष, केळी, आंबा, डाळींब व मोसंबी या पिकांसाठी लागू केलेली आहे. या योजने अंतर्गत सन 2020 हंगामात कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या फळपिकांना अवेळी पाऊस, कमी/जास्त तापमान, आर्द्रता, वेगाचा वारा व गारपीट या हवामान धोक्यापासून संरक्षण मिळणार आहे. तरी शेतकऱ्यांनी पुढीलप्रमाणे विमा हप्ता रक्कम भरुन पिक संरक्षित करणे आवश्यक आहे.
फळपिकाचे नाव, शेतकऱ्यांनी भरावयाची विमा हप्ता रक्कम रुपये/हेक्टर., विमा हप्ता भरण्याचा अंतिम दिनांक, नियमित विमा हप्ता, गारपीट विमा हप्ता पुढीलप्रमाणे आहेत.मोसंबी- ४०००,१३३३, दि.३१ ऑक्टोबर २०२०. केळी-७०००,२३३३,दि.३१ ऑक्टोबर २०२०. द्राक्ष-१६०००,५३३३, दि.१५ ऑक्टोबर २०२०. डाळींब-६५००, २१६७,दि.३१ डिसेंबर २०२०. आंबा-७०००,२३३३, दि. ३१ डिसेंबर २०२०
हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन २०२०-२१ साठी फळपिकनिहाय अधिसुचित तालुके व महसूल मंडळे.
फळपिकाचे नाव, अधिसुचित तालुके, अधिसुचित महसूल मंडळे पुढीलप्रमाणे आहेत.द्राक्ष, केळी, आंबा व डाळींब,उस्मानाबाद जिल्हयातील सर्व तालुके, उस्मानाबाद जिल्हयातील सर्व महसूल मंडळे पुढीलप्रमाणे आहेत.मोसंबी उस्मानाबाद- उस्मानाबाद ग्रा., ढोकी, तेर व जागजी. तुळजापूर- सर्व महसूल मंडळे.भूम- वालवड, माणकेश्वर, अंभी व ईट. परंडा-सर्व महसूल मंडळे. वाशी-सर्व महसूल मंडळे. कळंब- शिराढोण. लोहारा- लोहारा.
उपरोक्त नमूद केलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घेता येईल. मंडळातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उमेश घाटगे यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहीतीसाठी नजिकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा.
