वाशी, दि. 22 : तुषार शिवाजी राठोड, रा. आडेगाव, ता. अंबड, जि. जालना हे दि. 20.10.2020 रोजी 23.30 वा. सु. पारगाव टोलनाक्या पलीकडे रस्त्याने ट्रॅक्टर चालवत जालन्याकडे जात होते. यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनात आलेल्या अनोळखी 4 व्यक्तीनी तुषार राठोड यांचे ट्रॅक्टर आडवून तुषार यांच्या खिशातील टेक्नो कंपनीचा मोबाईल फोन हिसकावून घेउन ट्रॅक्टरसह तुषार यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. यात तुषार राठोड हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या तुषार राठोड यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 394, 34 अन्वये गुन्हा दि. 21.10.2020 रोजी नोंदवला आहे.
उमरगा : उज्वला रत्नदिव कुलकर्णी, रा. येणेगुर, ता. उमरगा यांच्या मालकीचे एक्सकॅव्हेटर यंत्र क्र. एम.एच. 14 जीएस 2779 हे दि. 20 ते 21.10.2020 रोजीच्या मध्यरात्री येळी येथील फैज पेट्रोलीयम विक्री केंद्र येथून अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. अशा मजकुराच्या उज्वला कुलकर्णी यांनी दि. 21.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : समीर सुधीर कुरुम, रा. उमरगा यांनी स्वत:ची हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 13 एके 0604 ही दि. 16.10.2020 रोजी 07.30 वा. उमरगा बसस्थानकाच्या आवारात लावली होती. ती त्यांना 0745 वा. लावल्या जागी आढळुन आली नाही. यावरुन ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या समीर कुरुम यांनी दि. 21.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : महादेव नागनाथ शिंदे, रा. काळेगाव, ता. तुळजापूर हे दि. 20.10.2020 रोजी सायंकाळी राहत्या घरास कडी लावून घरासमोरील अंगनात झोपले होते. दि. 21.10.2020 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराची कडी उघडून आतील 15 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम 17,000/-रु. असा एकुण 62,000/-रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या महादेव शिंदे यांनी दि. 21.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.