तुळजापुर : कुमार नाईकवाडी

प्रवाशांच्या सेवेसाठी तुळजापूर आगारातून रोज तुळजापूर ते हैद्राबाद  ही नविन बस सेवा सुरु करण्यात आली असून या बसचे पूजन गुरुवार दि. 22 रोजी करण्यात आले. यावेळी चालक व वाहक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे, तुळजापूर तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, तुळजापूर शहरप्रमुख सुधीर कदम, माजी उपजिल्हाप्रमुख शाम पवार, उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, उपतालुकाप्रमुख सुनिल जाधव, संजय भोसले, युवासेना जिल्हाचिटणीस लखन परमेश्वर, युवासेना तालुकाप्रमुख प्रतिक रोचकरी, युवासेना शहरप्रमुख सागर इंगळे, सोशल मिडीया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, आगारप्रमुख राजकुमार दिवटे, स्थानक प्रमुख बी.एस. राठोड, चालक एन.बी. दिडोळे, वाहक के.ए. हंगरगेकर, आर.आर. जगताप, एस.व्ही. सुरवसे आदीजण उपस्थित होते.

 
Top