नळदुर्ग : एस.के. गायकवाड

खुदावाडी पाटील तांडा, ता.तुळजापूर येथील मुळ रहीवासी असलेले व सध्या नगर परिषद गडहिंगलज जि. कोल्हापुर येथे आरोग्य निरिक्षक म्हणून शासकीय सेवेत कार्यरत असलेले प्रकाश लक्ष्मण राठोड यांना लकी ग्रुप गडहिंगलजच्या वतीने कोरोना योध्दा सन्मान पत्र देवून नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

लकी ग्रुपचे अध्यक्ष अजमद मिरा, उपाध्यक्ष जैद तांबोळी यांच्या सहीनिसी ग्रुपच्या वतीने देण्यात आलेल्या सन्मान पत्रात म्हटले आहे की, घरदार सोडून स्वतः च्या जीवाची पर्वा न करता कोव्हिड-१९ कोरोना विषाणू महामारीच्या काळात देशाला आभिप्रेत असा राष्ट्रधर्म जोपासत अविरतपणे कोरोनासी लढा देत जनतेच्या सेवेत आहात, त्याकरीता आपणास हे सन्मान पत्र देण्यात असल्याचे नमूद केले आहे.  त्यांना मिळालेल्या या सन्मान पत्राबद्दल मित्रपरिवारानी त्यांचे आभिनंदन केले आहे.

 
Top