तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी मातेच्या दरबारात दि. ९ आँक्टोबर रोजी मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिस-या पर्वाला जागर मोर्चाने सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी तुळजापुर तालुक्यात ग्रामीण भागात मराठा आरक्षणासाठी मोर्चे बांधणी करण्यात आली. तसेच तुळजापुर तालुक्यात व शहरात "एक मराठा लाख मराठा" जागर मोर्चाचे बैठकीचे फड गाजु लागले आहेत. तर बुधवार दि. 30 सप्टेंबर रोजी सकल मराठवा बांधवाची बैठक संपन्न झाली.
मराठा समाज बांधवानी या अगोदर ५६ मोर्चे शांततेने काढले. अनेक मराठा बांधवानी आरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. पण या राज्य व केंद्र सरकारला न्यायालयीन लढ्यात आरक्षण टिकविता आले नाही. त्यामुळे या केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्ते पणामुळे मराठा बांधवाची घोर निराशा झाल्यामुळे मराठा बांधव पेटून उठला आहे.
तुळजापुर तालुक्यात ग्रामीण भागात राहणाऱ्या मराठा बांधवासोबत सकल मराठा बांधवाच्या वतीने मराठा आरक्षण जागर मोर्चाच्या बैठका घेतल्या. तसेच तुळजापुर शहरातील पुजारी मंगल कार्यालयात दि. ३० बुधवार रोजी सकल मराठा बांधवाच्या वतीने मराठा जागर मोर्चा साठी बैठक संपन्न झाली. येणाऱ्या दि. ९ ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण जागर मोर्चा करण्यासाठी व्रज मुठ बांधण्यात येणार आहे. सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने तालुक्यातील व शहरातील मराठा समाज बांधवानी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा बांधवाच्या वतीने करण्यात आले आहे.

