तुळजापुर : कुमार नाईकवाडी
संसर्गजन्य कोरोनामुळे गेल्या सात माहिन्यापासुन राज्यातील धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे राज्यातील अनेक धार्मिक स्थळाची आर्थिक व्यवहारामुळे फार बिकट अवस्था निर्माण झाली आहे. तसेच व्यापारी वर्ग, सामान्य नागरीकांचे मोठे हाल होत आहेत. तरी राज्य सरकारने नियम व अटी घालुन धार्मिक स्थळे उघडण्यात यावेत, असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापुर येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
तुळजापुर तालुक्याचे भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे तुळजापुर येथील शासकीय विश्राम गृह येथे गुरुवार दि. १ ऑक्टोबर गुरुवार रोजी आयोजित पञकार परिषदेत बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विनोद गंगणे, नागेश नाईक, नारायण नन्नवरे, शिवाजी बोधले, रत्नदीप भोसले, श्रीनाथ शिंदे आदीजण उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने शहरे अनलॉक केले असताना इतर राज्यातील धार्मिक स्थळे उघडले आहेत. परंतु राज्य शासन महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे उघडण्यासाठी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असेल तर आम्ही भाजपाचे आमदार राज्यपाल यांच्याकडे जाणार, वेळ पडली तर उच्च नायालयात धाव घेणार, सरकारने धार्मिक स्थळे उघडण्यासाठी जे काही नियमावली सादर करावी, आम्ही सामाजिक अंतर पाळुन योग्य त्या उपाययोजना करुन त्यांचे पालन करु, गेल्या जुन ते जुलै पासुन टप्या टप्याने मंदीर उघडण्यासाठी सतत मागणी करीत आहोत. पण सरकार मनावर घेत नाही. शासनाने निर्णय घेऊन नियम अटी घालुन सर्व धार्मिक उघडण्यासाठी प्रयत्न करावेत, शहरातील धार्मिक स्थळातील नागरीकांना व्यापारी वर्गाला व इतर सामान्य गोरगरीबांना आर्थिक व्यवहाराचा मोठा फटका बसला आहे. तरी राज्य सरकारने धार्मिक स्थळा बाबतीत मंदीरे उघडण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
