तुळजापुर : कुमार नाईकवाडी 

दि. ११ ऑक्टोबर हा जागतिक बालिका कन्या दिवस म्हणून साजरा केला जातो. दि. ११ ऑक्टोबर २०१२ ला पहिला जागतिक बालिका कन्या दिवस साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून जगामध्ये मुलींच्या विकासासाठी तसेच जगातील काही ठिकाणी होणाऱ्या स्त्री-भ्रृण हत्या रोखण्यासाठी हा दिवस साजरा केला जावू लागला. हा दिवस संयुक्त राष्ट्र द्वारा घोषित करण्यात आला आहे.

देशामध्ये स्त्री-भ्रृण हत्या ही समस्या रोखण्यासाठी तसेच मुलींना मुलांप्रमाणे समान हक्क मिळायला हवे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या कार्यक्रमामुळे देशात बऱ्याच  जिल्ह्यांमध्ये स्त्री-भ्रृण हत्या करण्याचा दर कमी झाला आहे. आज मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत. त्यामुळे काही सामाजिक समस्येमुळे मुलींना पुढे जाता येत नाही. म्हणून समाज जागृती व्हावी. 

या साठी हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो. 11  ऑक्टोबर रोजी जागतिक बालिका दिनाचे अवचित्य साधून बेटी बचाव बेटी पढाव अभियान व्यापक स्वरूपात जनसामान्या पर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस उप विभागीय अधिकारी दिलीप टिप्परसे व पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक कृतीचे आयोजन करण्याचे आवाहन बाल कल्याण पोलीस अधिकारी तथा उप पोलीस निरीक्षक विकास दांडे, उप जिल्हा रुग्णालय तुळजापूर च्या वैद्यकीय अधीक्षक चंचला बोडके व बाल सहाय्य पोलीस पथकाचे अशासकीय सदस्य संजयकुमार बोंदर   यांनी केले आहे.

या मध्ये  "बेटी बचाव,  बेटी पढाव" अभियान चा लोगो व टॅगलाईन वापरून वयक्तिक वॉट्सअप डीपी व वॉट्सअप ग्रुप डीपी ठेवण्याचे आवाहन पोलीस उप निरीक्षक विकास दांडे यांनी केले आहे.

 
Top